औरंगाबाद: कार आणि दूचाकीचे समोरासमोर अपघात होऊन पाच तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास दौलताबाद घाटात घडली.जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अरीहांत एकनाथ चव्हाण वय 19वर्ष (रा भारत माता कॉलोनी), सलमान शेख शौकत वय18वर्ष, आरफात शेख असद वय 19वर्ष ,उझर खालिद पटेल वय 18वर्षे, शकील करीम पटेल वय 18 वर्ष, (चौघे राहणार बिडबायपास, औरंगाबाद) अशी जखमींची नावे आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेली अधिक माहिती अशी की, रात्री दीड वाजेच्या सुमारास एका चारचाकी कार ने सलमान,आराफत, उझर, शकली हे तरुण औरंगाबादहून खुलताबाद कडे जात होते तर अरीहांत हा दुचाकीने औरंगाबादच्या दिशेने जात होता दरम्यान दौलताबाद घाटातील वळणावर अंधारामुळे दोन्ही वाहनचलकणाचा अंदाज चुकला व दोन्ही वाहने समोरासमोर भिडली.या अपघातात कार मधील चार जण आणि दुचाकीवरील एक असे पाचही तरुण गंभीर जखमी झाले . त्यांना नागरिकांनी तातडीने घाटी रुग्णालयात हलविले सर्व तरुण जखमी होते त्यांना कुणीही मदत करीत नसल्याचे पाहून शेख अजीम नावाच्या तरुणाने या सर्व जखमींना घटित मदत करीत रुग्णालयात दाखल केले.या अपघाता प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद केली आहे. जखमी तरुणावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.